ह्या ट्रेकचा अनुभव जरा वेगळा आहे. हा ट्रेक सप्टेंबर 2019 मधला. मी आणि माझा मित्र महेश ने दोन दिवस ट्रेक प्लॅन केलता. एक दिवस कलावंतीण दुर्ग करायचा आणि दुसऱ्या दिवशी ढाक बहिरी यात मी तुम्हाला कलावंतीण दुर्ग ट्रेक ची कहाणी नाही सांगणार पण जे ढाक बहिरी ट्रेकला झाल ते आम्ही कधी विसरू शकणार नाही. आम्ही नेहमीप्रमाणे ट्रिपचा प्लॅन ‘ऑफ डे’ लाच केला. कलावंतीण दुर्ग रविवारी करायचा आणि सोमवारी ढाक बहिरी करायचा असा प्लॅन होता. म्हणून कलावंतीण ट्रेक झाल्यानंतर पनवेल जवळ आम्ही एक हॉटेल रूम बुक केली. कारण पाऊस पण खूप सुरू होता आणि कुठे Tent पण टाकू शकत नव्हतो. आम्ही पूर्ण भिजलेले होतो. मग हॉटेल रुमवर गेल्यानंतर ठरवलं की दुसर्या दिवशी सोमवारी लवकर उठून ढाक बहिरी ला जायचं. रात्री चिकन बिर्याणी खाऊन जे झोपी गेलो तर थेट सकाळी दहा वाजताच उठलो. आणि म्हटलं आता झाला मोठा गेम पण आपल्याला ढाक बहिरी ला जायचं म्हणजे जायचं होत. मग तिकडे किती उशीर झाला तरी चालेल.
मग आम्ही फ्रेश झालो नाष्टा केला आणि हॉटेल बाहेर आलो. नेहमीप्रमाणे इंस्टाग्राम वर स्टोरी अपलोड केल्या. (अरे फोटोज तर महत्त्वाचे आहे ते सोडून कस चालेल) आणि बाईक वर बसलो आणि बाईकला किक मारली आणि खाली बघतो तर काय बाईकच टायर पंचर. हा तर खूप मोठा डोक्याला शॉट झाला म्हंटल आता येवढच बाकी होत. मनात आलं की नेहमी अस आपल्याबरोबरच का होत यार. असो जे व्हायच असत ते होतच आणि हॉटेलवाल्याला विचारलं जवळ कुठे पंचर काढणारा आहे का कोणी. नशीब हॉटेल पासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर एक जण होता पंचरवाला.
पण आम्ही ट्रेक साठी ऑल रेडी लेट झालो त्यात हे पंचर काढायचा अजून वेळ गेला. जवळ जवळ तिथून निघायला १२ वाजले आणि आम्ही आमचा प्रवास सुरु केला कर्जत मार्गे ढाक बहिरी दिशेने. गुगल ताई आपल्याला रस्ता दाखवत होत्या साधारण अडीच वाजता आम्ही पायथ्याला पोहोचलो आणि कसलाही विलंब न करता ट्रेक स्टार्ट केला पण ऑफ डे असल्याने एक पण ट्रेकर दिसत नव्हता. फक्त आम्ही दोघेच संपूर्ण जंगलात पाऊल वाट शोधत शोधत पुढे चाललेलो थोडेफार खाणाखुणा लोकांनी केलेल्या होत्या जंगलात. आम्हाला त्यांचा फायदा होत होता जवळजवळ दोन तास ट्रेक केल्यानंतर आम्ही ढाक बहिरी पर्यंत पोहोचलो जेवढा हा ट्रेक छोटा वाटला होता तेवढा पण छोटा नव्हता. पूर्ण दोन डोंगर ओलांडून या पर्यंत आपण पोहोचतो.
Finally आमचा ढाक बहिरी चा खरा thrill सुरू झाला आणि यात भर टाकली ती पाऊसाने. जोरदार पाऊस सुरू झाला. ढाक बहिरी सर करण्यात खूप आडथले येऊ लागले. आम्ही निम्या पर्यंत कसबस climbing करत आलो आणि रोप check केली तर ती पूर्ण कुजून गेलेली होती. आम्ही त्या रोप वर थोड वजन दिलं की त्याचे दोरे आमच्या हातात येत आणि त्यात पाऊस पण सुरू मग म्हटलं नसत धाडस करण्यात काय मजा नाही. आपण आता मागे फिरू नंतर परत कधी येऊ. आणि आम्ही तिथून मागे फिरलो. तेव्हा साधारण ४ वाजले असतील. खूप उशीर झाला होता. आणि लक्षात आल की आपल्याला मागे जायला पण भरपूर वेळ लागणार आहे.
आम्ही मग ढाक बहिरी वर जाण्याचा विषय सोडून दिला आणि निघालो मागे. मागे जात असताना आम्हाला लक्षात आलं की आपण रस्ता चुकलो आहे. आपल्याला चकवा लागला आहे. आम्ही डोंगर उतरण्या ऐवजी अजून दाट जंगलात आत आत जात होतो अस लक्षात आलं आता काय करायचं काहीच कळत नव्हतं. आम्ही दोघांनी एकमेकां कडे बघितलं आता काय करायचं याचा विचार करू लागलो. मी म्हणायचो हा रस्ता बरोबर आहे. थोडे पुढे गेलं की तो रस्ता संपयचा आणि तो बोलायचा की हा रस्ता बरोबर आहे, आणि थोड पुढे गेलं तो रास्ता संपायचा. आम्हा दोघांना काही कळत नव्हत कुठ जाव. खर तर तिथे गावातली लोक सरपणा साठी झाडे तोड करत म्हणून त्यांनी येवढ्या पाऊल वाटा करून ठेवेल्या होत्या की बास. त्या मुळे कोणती वाट बरोबर आणि कोणती चूकीची हे काही कळत नव्हत. जंगलात अंधार पण लवकर पडू लागला होता. जंगली प्राण्यांचा आवाज, रात किड्याचा आवाज, त्यात पडणारा पाऊस मनात एक वेगळीच धडकी भरवीत होता. आज ही तो क्षण आठवला की शरीरावर शहारे येतात. आम्ही जवळ जवळ दोन तास एकाच ठिकाणी भटकत होतो. जर आमच्या बरोबर कोणी दुसरं असतं ना खोट नाही सांगत तो रडला असता. धड आता आम्हला परत ढाक बहिरी कडे जाता येत नव्हत कारण तिथे जाऊन कमीत कमी रात्र काढता आली असती. तिकडे जाण्याचा तो पण रस्ता कळत नव्हता आणि आम्हला खाली पण जाता येत नव्हत. खाली उतरायचा रस्ता पण समजत नव्हता.
"करो या मरो " अशा परिस्थिती मध्ये आम्ही आडकलो होतो. पण आम्हाला आठवले ते आमचे गुरू "Bear Grylls अण्णा" आम्ही विचार केला ते जर अशा परिस्थिती मध्ये आडकले असते तर त्यांनी काय केलं असत. मोबाईल बाहेर कडला तशी मोबाईला range नव्हती तो भाग वेगळा त्यावर compass open केलं दिशा बघितली आपल्याला कोणत्या दिशेला जायच आहे. आम्ही जेव्हा वर ढाक बहिरीला निघालेलो तेव्हा दिशा बघून घेतलेली त्याचा फायदा आता झाला. आम्हाला दक्षिण दिशेला जायच होत. आणि आम्ही कसला विचार न करता सरळ उतरायला सुरू केलं धबधब्याच्या सहाय्याने. कारण प्रत्येक धबधबा हा कोणत्या न कोणत्या नदी कडे जातो. आणि नदी गावा कडे जाते हे आम्हाला फायदेशीर ठरलं. जवळ जवळ आम्ही दीड तासाने एका ओळखीच्या पाऊल वाटेवर पोहोचलो.जीवात जीव आला. समोरून एक कुत्रा आमच्या कडे येताना दिसला. आधी तर त्याला बघून अस वाटलं की कोणी लांडगा आमच्या कडे येतोय. पण तो कुत्रा निघाला त्याच्या मागे एक गावकरी पण होता आणि ते जंगलात कदाचित शिकारीला चालले होते. त्यांनी आम्हाला प्यायला पाणी दिले. आणि पुढचा रास्ता दाखवला. ते बोलले ही पाऊल वाट बरोबर आहे. तुम्ही शेवट पर्यंत सोडू नका आम्ही त्यांचे आभार मानले आणि पुढे निघालो. सात वाजता पायथ्याला गावात पोहोचलो.
पण या ट्रेक मधे जेवढे हाल झाले. तेवढीच मजा पण आली हा नवीन अनुभव आम्हाला खूप काही शिकवून गेला हा ट्रेक आयुष्यात कधी विसरणार नाही. शेवट येवढचं " एक थी राणी एक था राजा बस खतम कहाणी " मजाक केली थोडी नाही तर मनावर घेताल. अजून तर खूप गोष्टी सांगायच्या आहेत.
शेवट ऐवढचं सांगेल weekdays मधे ट्रेक करू नका खूप लागते. करायचा असेल तर माहितीच्या ठिकाणी करा आणि बरोबर गावातला गाईड नक्की घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं Solo ट्रेक करू नका यात विचार करा मी एकटा असतो. तर काय झाल असत. शेवटी मी आभार मानले आपले गुरु "Bear Grylls अण्णाचे". त्याची शिकवण कुठे वाया जात नाही...
(यात एकच खंत वाटते मी फोटो नाही कडू शकलो या मधे म्हणून मी फोटो अपलोड नाही केले)