#keeptravellingkeepwritting
उंच डोंगरावर सांडलेले दगड
एकुणचं ग्रामीण जीवन मला खूप भावत. पण आता कर्नाटकात छोट्याश्या खेड्यात जे काही अनुभवायला मिळालं ते शब्दात मांडणे कठीण आहे. इतक्या विविध प्रकारचे जीव असतात हेच मुळात माहीत नसतं माणसाला किंवा आता ते लक्षात ठेवायला वेळ नसेल त्याला. आता फक्त आपल्या बुद्धीच्या जीवावर सगळ उधवस्त करायच असा वसा घेतलाय मनुष्याने.शहरा मध्ये नुसत गडबड -गोंधळ,भरमसाठ लोक अन त्यांची मतमतांतर .पण इतकच आयुष्य नाही आहे, इतर जीव सुध्दा अस्तित्वात आहेत हेच विसरून जातो आपण.
ती सुपारी- नारळाची झाडं, ती प्रेमळ माणसं, ते झाडांनी फुललेले रस्ते, आणि मध्येच ट्रेन चा आवाज. जेवायला सांबार भात, पापड, लोणचं, केळी- कलींगड. हे सगळं माणुसकीच्या भावनेतून आलेल, जबरदस्तीने नाही किंवा परतीची अपेक्षा नाही .
त्या अरुंद वळणावळणच्या रस्त्यावरून जाताना कट्ट्यावर बसलेला तो म्हातारा, आपले आजोबाच आहेत असा होणारा भास,तीच पेपर वाचयची पध्दत आणि मोतीबिंदूचा धुरकट चष्मा.
शाळेतून घरी चाललेल्यां मुलांमध्ये अचानक आपला शाळेतला मित्र असल्याची जाणीव होते, आठवडी बाजारात दोन्ही हातातून भाजी घेवून येणारे टोपी घातलेले बाबा दिसायला लागतात. हे सगळं त्या खेड्यातच होणार.
अमृतेश्वर मंदिर पाहायला जाताना तर मध्वाचार्यानच्या गावाला जातानाचा फील आला. एका वळणावर अस वाटला की इकडेच घर घ्यावं. सुपारी - नारळ च्या झाडांनी तर मला पुरता वेडा केल होत. त्या वेगवेगळ्या चिमण्या, पोपट,ते रान कबूतर,मैना, खार, वेडा राघू,भारद्वाज ह्या छोट्या मित्रांकडेच माझ् लक्ष्य होत. एका electric च्या खांबावर बसलेल पाढ़रा शुभ्र कबूतर अणि अचानक समोर आलेली भारद्वाजाची जोडी. तो मोरांचा हुंकार आणी आगगाडी ची शिळ येवढाच काय तो आवज.
दिवसाच्या शेवटी त्या खेडयातल्या चावडीवर झालेली सभा.पंचायती तली ती सन्ध्याकाळ तर मनात एक वेगळी जागा करुन गेली. जसं पु ल म्हणतात त्या उतार वयातल्या आकृत्या बोलायला लागल्या की काळजात धस्स होत. चेहर्यावरच्या सुरकुत्या, आयुष्यात झेलले ल्या सगळ्या गोष्टींची जाणीव करुन देतात.दुपारच्या सांबार भातान मम्मानच्या(my MIL) हाताच्या चवीची आठवण करुन दिली.
आणि मग आला trip चा शेवटचा दिवस.चित्रदुर्ग वरुन परतीची गाडी असल्यामुळे तो दुर्ग पण पहायला मिळाला. अजम्पुरा हा भाग पठारी आहे त्यामूळे तिकडे शेती आहे पण जस चित्रादुर्ग जिल्ह्यांत आलो तस डोंगर दिसायला लागले.
ज्याला आपण sedimentary rock म्हणतो म्हणजे गाळाचे दगड असे काही मोठाले दगड शिळाच्या शिळा आकाशातून जमिनीवर सांडल्या तर कस चित्र तयार होईल तसच काही चित्र इथल्या डोंगरमाथ्यावर दिसतं.
खूप मोठ्या परिसरामध्ये सामावलेला हा किल्ला पूर्णपणे पिवळ्या पिवळ्या दगडांमधला होता. थोडफार इस्राएल मधल्या सेकण्ड टेम्पल किंवा मीना प्रभुंनी वर्णन केल्याप्रमाणे इराणच्या त्या किल्ल्याची आठ्वण करुन देणारा होता. दगडांच्या कपारितून येणार्या खारी, उडणारे पोपट अणि माकडाची कुटुंबाच्या कूटुंब.गडावरचा किल्ला म्हणजे काळ्या दगडातले बुरुज हे चित्रच मुळात या किल्ल्यांन बदललं.
एकुणचं हंपी कसं असेल ह्याचं एक चित्र तयार झालंय. आता मात्र मी स्वतःला थांबवण अवघड आहे. कधी एकदा पुन्हा त्या दक्षिण कर्नाटकातल्या सुपारी नारळाच्या जंगलात अन् उंच डोंगरावर सांडलेल्या दगडात उडी मारतोय असं झालंय.
तस थोड फार लिखाण मी नेहमी करतो पण ते माझ्या पुरत असते, पण सोशल मीडिया वर टाकायची पहिलीच वेळ. धन्यवाद.
-प्रशांत कुलकर्णी