कोंढाणा ऊर्फ सिंहगड - पुण्यापासून तब्बल ३० कि.मी अंतरावर आहे. हा गड समुद्र चौपाटी पासून ४४०० फू. उंच आहे. दख्खन पठाराचा दरवाजा सिंहगड येथूनच चालू होतो.
सकाळी उठून सिंहगडाला जायचे या Excitement रात्रभर झोप लागली नाही. पहाटे ४-३० ला उठलो असेल लगेचच अजिंक्य ला उठवायला call केला तो तर आवरून निघत होता. मी पटकन अवरले. तो पर्यंत माझा घरा खाली आला होता. २ व्हीलर काडली आणि निघालो, उत्तमनगर मधून. ५ -२० झाले असतील. मस्त गरम गरम चहा घेतला आणि डायरेक्ट गाडी सिंहगड वर नेऊन थांबवली.
फेब्रुवारी महिन्यातील एवढी थंडी आणि गुलाबी पहाट मी पहिल्यांदाच बघत होतो. अजुन तसा सूर्योदय झाला नवता. पण खूप भारी वाटत होत.
सिंहगडचा टेहळणी बुरुजावर जाऊन बसलो दोघे, सूर्योदयाची वाट बघत. हळू हळू सूर्य जसा काळ्या डोंगराच्या कुशीतून बाहेर येत होता तसा तास सगळे आकाश गुलाबी होत चालले होते. असा अनुभव मी पहिल्यादाच घेतला.
हां जो अनुभव होता तो मला कॅमेरा मध्ये कैद करून ठेवायचा होता. मोबाईल आणि कॅमेरा मध्ये सूर्यनारायणाचा फोटो घेऊन आम्ही सिंहगडचा पहिल्या महाद्वार समोर येऊन थांबलो
०५-०२-२०२० काल पासून मनाला हुर हुर लागली होती ती सिंहगड ला जायची.
०४-०२-२०२० रोजी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी अतुर झालो होतो. याला सुद्धा एक कारण असे की ०४-०२ रोजी सरदार तानाजी मालुसरे यांनी तहा मध्ये गेलेल्या कोंडण्यावर सर करून त्याचा सिंहगड केला. आणि वीर गती प्राप्त झाली.
याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या साठी उदगार काढले
" गड आला पण सिंह गेला "