अचानक तीन दिवसा ची सुट्टी होती म्हटलं काय कराव काय कराव तितक्यात सुचलं कि ट्रेकला जाऊ मग् आम्ही लिस्ट काढली कि दोन मुक्काम आणि 3 दिवस काय करू शकतो मग काय एक लिस्ट काढली कलसुबाईं - सन्धन् --रतनगड करायचा आता तेथील लोकल गाईड हवा होता आम्ही चौकशी केली आणि आंम्हाला भास्कर बादड या व्यक्तीचा नुंबर मिळाला त्यांना कॉल केला आणि त्यांना फक्त आम्हांला तीन दिवस सुट्टी असल्याचं सांगितलं त्यांनी लगेच प्लॅन समजावून दिला आणि आम्ही बॅग्ज भरून तयार झालो भाऊंनी सांगितल्या नुसार आम्ही लोकल ने कसारा पोहचलो सकाळचे 3:30 वाजले होते त्यांनी पाठवलेला गाडीवाला वेळेचा आधी हजर होता आम्हि बारी गावात 5:30 ला पोहचलो भास्कर दादाने सांगितले की तुम्ही तुम्हाला लागणारे आवश्यक सामान बरोबर घ्या आम्ही पाणी बॉटल ड्राय स्नॅक्स बरोब्बर घेतला आणि कळसुबाई टॉप गाठला तिथे पोचल्यावर सुर्योदय पाहण्याची जि ओढ असतें ती काही वेगळीच ती सोनेरी किरण ,धुक्यात हरवलेला भंडारदरा जलशय् आणि चहुबाजुने असणाऱ्या डोंगर रांगा ओह्ह्ह्ह काय तो नजारा तेथे गेल्यावर कळतो
सूर्योदय पाहून आम्ही मस्त भज्जी, मग्गि,आनि चहा वर ताव हाणला वा मस्त आता कोवलि किरणांचा मस्त स्पर्श घेत आम्ही उतरायला सुरुवात केली हा रस्ता पूर्णपणे विरुध्द दुशेला जात होता कळसुबाई वर यायला तशा चार वाटा 1)बारी कडून
2)इंदोरे गावातून
3)पेन्द्शेत्
4)उददव्ने गाव
अशा ह्या वाटा उददवने गावाकडे उतरायला सुरुवात झाली काय सुरेख आहे काय सांगू वाटेत एक ठिकाणी औदुंबराच्या झाडाच्या बुंध्यापाशी पाण्याचं ताक आहे तिथे पाणी पिउन् आम्ही उतार सुरु झाला मस्त एक्ष्पोझर् वरून चालतांना जि मज्जा येत होते आम्ही उड़दवने गावात साधारण १वाजता पोचलो होतो तोवर गाडी वाला हजर होता आम्ही गाडीत बसून साम्रद गावात पोचलो आणि मस्त दुपारचं जेवण केलं थोडासा अराम करून आम्ही सन्धन्व्ह्यलि पहिली तो निसर्गाचा अविष्कार वेगळाच आनंद अचानक कसं झालं असेल असं हा प्नश्न् डोक्यात फिरू लागला आणि मन भुगोलात् रममाण झालं सान्धन् म्हणजे दोन गोष्टी जोडने
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून प्रत्विधि आटोपून आम्ही चाहा बिस्कीट घेतलं आणि अम्रुतेस्वरच् दर्शन घेऊन रतनगड चढाई सुरु केली चालतांना मधेच पक्षी उडत होते तर काही मंजूळ आवाजात गात होते ते मन्त्रमुग्द् संगीत ऐकत कधी रतनगड टॉप गाठला कळले नाही रतनगडा वरील गणेश द्वार,रत्नुबाई मंदिर,राणीचा हुंडा,पाण्याची टाकी,नेढं, प्रवरा नदी उगम पाहून त्रेम्बक् दरवाजाने आम्ही खाली उतरलो खाली आल्यावर नदीत मनसोक्त पोहून दुपारी जेवनावर् ताव मारून आम्ही निरोप घेतला या ट्रेक मध्ये आम्हाला भास्कर,संतोष,आणि त्यांचा टीम च खूप सहकार्य लभल् आणि आम्ही आयुष्यात पुन्हा एक नवीन नातं जोडलं
किल्ले रतनगड इतिहास :
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे, गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे –
• १ – गणेश दरवाजा.
हा रतनवाडी-पूर्वेकडून गडावर जातो
• २ – रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
• ३ – मुक्कामाची गुहा.
• ४ – प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
• ५ – इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
• ६ – कडेलोट पॉइंट.
• ७ – राणीचा हुडा (भग्न बुरूज)
• ८ – प्रवरेचे उगमस्थान.
• ९ – मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
• १० – अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
• ११ – नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
• ११ – कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
गडावरील राहायची सोय:
गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात. गडावरील खाण्याची सोय गडावर खान्याची सोय नाही. स्वताला ती व्यवस्था करावी लागते.गडावरील पाण्याची सोय गडावरील पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाज्याजवळील झरा सुमधुर आहे.
गडावर जाण्याच्या वाटा: गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
१. साम्रद गाव
२. रतनवाडी
३. कुमशेत
ही वाट कुमशेत वरुण कातराबाई मार्गे गणेश दरवाजा गडावर जाते
मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे शेंडी भंडारदरा धरणाला वळसा घालून साम्रद गावाला जाता येते
नाशिक हुन घोटी मार्गे शेंडी भंडारधरा आणि साम्रद
पुणे हुन चाकन ,राजगुरू नगर, पेठ ,मंचर, नारायण गाव, आळेफाटा, ओतूर, ब्राम्हण वाडा, कोतुळ, राजुर, शेंडी भंडारदरा, पांजरे, उडदावने, साम्रद गावात,
साम्रद गावातून गडावर पोहचण्याकरिता 2:30 तास लागतात.
रतनवाडी गावातुन 3 तास लागतात