Harishchandragad (हरिश्र्चंद्रगड)

Tripoto
23rd Mar 2018

Harishchandragad is a hill fort in the Ahmednagar district of India. Its history is linked with that of Malshej Ghat, kothale village .

23 मार्च (5 pm ) :- आम्ही 6 मित्र 3 बाईक वरती पुण्याकडून हरिश्चंद्रगडा कडे निघालो . यामधील अंतर
175 km  होता . 5 वाजता ठीक आम्ही पुणे सोडले आणि निघालो आमच्या वाटेने मग 8 वाजता चहा साठी ब्रेक घेतला तेंव्हा कुठे 80 km अंतर पार झाले होते. रात्रीची वेळ आणि समोरून येणाऱ्या गाडया आणि त्यांचा प्रकाश खूप त्रासदायक प्रवास चालू होता. रात्रीचे 11 वाजले मग ठरवलं की आपण जेवण करून घेऊ . एवढ्या रात्री तिथे काही मिळणार नाही . एका हॉटेल मध्ये जेवण केलं आणि तिथून निघालो . आणि एका फाट्या पासून आत निघालो त्या गावाच्या पायथ्याशी ( खिरेश्वर गाव ) . काळोख अंधार आणि आमच्या फक्त 3 गाड्या भीती वाटत होती एवढा भयानक रोड आणि बाजूला मोठा तलाव .
कसे कसे रात्री 12  वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोंचलो. तिथे एका घराबाहेर रात्र घालवली .

24 मार्च ( 7am ) :- सकाळी सर्वजण तयार झाले , चहा बिस्कीट घेतले आणि आम्ही गाड्या तिथेच पार्क करून गड चढण्यास सुरुवात केली. सुरवात अशी झाली की असे वाटायला लागले की आपण कधी हा पार करणार . लिंबू शरबत घेत घेत कसे तरी वर पर्यंत गेलो. वरून सुर्यादेवता आग सोडत होते आणि उन्हाळा होता , त्यामुळे थोडे जास्तच हाल झाले . पाणी खालून भरून घेतले होते ,
( 12 lit) प्रत्यकाकडे 2 बॉटल अस , मग दुपारी 1  वाजता आम्ही वरती ( मंदिराजवळ ) पोहनचलो .
मग तिथे आराम केला आणि 5 वाजता नाश्ता करून कोंकण कड्याकडे निघालो . परत कोकणकड्याच्या कडेवर बसून सूर्यास्त पहिला, फोटोशूट केला , परत शेकोटी करून तिथे जेवन केले आणि tent मध्ये झोपलो .

25 मार्च ( 8am ) :-  सकाळी सर्व वरचं आवरून घेतले, ना कोणच्या मोबाइलला चार्जिंग ना नेटवर्क  , गड उतरण्यास सुरवात केली आणि उन्हामध्ये कसे कसे दुपारी 2 वाजता खाली पोहनचलो .
खाली जिथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या होत्या तिथे जेवण केले आणि ऊन कमी होई पर्यन्त आराम केला
मग आराम करून पुण्याच्या दिशेने वापस निघालो ..
अशी 3 दिवस 2 रात्रिची छोटी trip झाली .

तुम्ही पण जाऊ शकता तुमच्या फॅमिली , मित्रपरिवार यां सोबत .. एकदा तरी आयुष्यात हरिश्चंद्र ट्रेक करायला हवा असा मला वाटतं .

एकूण खर्च :- पेट्रोल एका(2 wheeler) गाडीला     (570₹ : 50 kmpl)
                  :- नाश्ता चहा पाणी 150₹
                  : जेवण (1 lunch 1 dinner ) 200/-
                  : रात्री झोपण्यासाठी ( tent on rent ) 140₹

( गडावर कोणत्याही नेटवर्कला range नाही भेटत. Jio नेटवर्क असेल तर सोयीस्कर होऊ शकत . )

मार्ग :- पुणे - चाकण - राजगुरुनगर - नारायणगाव - जुन्नर - खिरेश्वर (पायथा)

एकूण अंतर : 175 km .

धन्यवाद 😊

:- Sagar Potdar

Photo of Harishchandragad, Maharashtra by TrippyTravelkar