सुला वाईनयार्ड bhramangiri#भ्रमणगिरी

Tripoto
10th Oct 2020
Photo of सुला वाईनयार्ड bhramangiri#भ्रमणगिरी by Madhuri Naik

सुला वाईनयार्ड

१८ डिसेंबर २०१७ मध्ये कॉलेजच्या मित्राचे लग्न नाशिकला होते. लग्न दुपारचे होते. त्यामुळे आम्ही म्हणजे मी, अरविंद, मेघश्याम, पुजा, परशुराम असे सकाळी लवकरच ठाण्यावरुन निघालो. आरामात लग्न अटेंन्ड केले. दुपारी २-२.३० ला फ्री झाल्यावर विचार केला आता आलोच आहे नाशिकला तर काहीतरी फिरुन घरी जावे. नाशिकची मंदिरे सर्वानी बघितलीच होती.. मग नविन काय असा विचार करत असताना सुला वाईन यार्डला जाण्याचे ठरवले. नाशिक शहरापासुन थोड्याच अंतरावर हे यार्ड आहे.

सुला वाईनयार्ड्सची स्थापना श्री. राजीव सामंत यांनी १९९० च्या उत्तरार्धात केली होती. सामंत ह्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले आणि त्यानंतर कॅलिफोर्नियामधील ओरॅकल येथे काम केले. आपली कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर सामंत ह्यांनी सुलाची स्थापना भारतात परतल्यानंतर केली.

सुलाचे नाव सामंतच्या आईचे नाव होते - 'सुलभा'.

सामंतह्यांनी पुढील काही वर्षांत द्राक्षांच्या नवीन जातींचा परिचय करून आणि कंपनीच्या ऑफरचा विस्तार करून पुढील कंपनी हळूहळू वाढविली. आणि वाईनसाठी भारताचे नाव प्रसिद्ध झाले.

येथे तुम्ही पुर्ण वाइनयार्डची फेरी घेवु शकता. प्रति व्यक्ती १०० रुपये भरुन फेरफटका म्हणजे सुला वाईनयार्ड्स मध्ये प्रवेश आणि संपूर्ण सुला वाईनयार्ड्सचे त्यांच्या अधिकारी सोबत वाईन कशी बनते त्याची माहिती.

दुसरे म्हणजे ३०० रुपयात सुला वाईनयार्ड्स मध्ये फेरफटका आणि ६ प्रकारच्या वाईन टेस्टिंग. तेथे तुम्ही वाईन देखिल खरेदी करु शकतो.

आजुबाजुचा परिसर देखिल सुंदर आहे. बाजुलाच उपहारगृह आहे. समोर द्राक्षाचे मळे होते. आम्ही मस्त फोटो काढले. अशी लग्न आणि सुला वाईनयार्ड अशी छोटीशी पिकनिक करुन आम्ही घरी परतलो.

To connect with bhramangiri#भ्रमणगिरी

Day 1