जवळपास दोन महिने गेले जीवधन च्या प्लॅन ची आतुरतेने वाट बघत होतो. या आठवड्याची सुरवात काही तशीच झाली होती, प्लॅन चा लांब-लांब पत्ता नव्हता. अचानक बुधवारी दुपारी जुईचा sms आला, "सुधागड-सरसगड जायचा का?" रविवारी कोरिगड उतरतानाच विषय निघाला होता सुधागड-सरसगड केला तर सोबतच करायचा पण याच वीकेंड ला प्लॅन होईल अस वाटलं नव्हतं.
31st चा प्लॅन आणि c off बघून अखेर 29-30 चा बेत हाकला. तब्येत थोडी खचल्याने मी 28 ला हाल्फ डे घेऊन घरी आराम करण्यासाठी निघालो.
कसाबसा सकाळी 6.15 AM वाजता उठून, आवरून 6.30 ला घर सोडले. (हे प्रत्येक इंजिनिअर ला जमतं. 😅) सनी ने ऑफिस ला जाण्यापूर्वी निगडी ब्रिज ला ड्रॉप केलं. तिथून share रिक्षा पकडून चिंचवड स्टेशन गाठलं. मागोमाग डेक्कन आणि सिंहगड एक्सप्रेस निघून गेली पण लोकल चा काही पत्ता नव्हता. नेहमी प्रमाणे लोकल 15 मिनिटे उशिरा म्हणजे 7.10 AM ला आली. लोकल चा प्रवास फक्त लोणावळ्यापर्यंतच, तिथून पुढच्या प्रवासासाठी मला स्टेशन वर लोणावळ्याच्या थंडीत अर्धा तास वाट बघायची होती ती म्हणजे प्रगती एक्सप्रेस ची!! जुई पुण्यावरून प्रगतीने येत होती. वेळेचा फायदा उचलून मी पेट पूजा आणि थंडीचा औषध म्हणजे चहा पिऊन ट्रेन ची वाट बघत बसलो. इथे ही ठरल्याप्रमाणे ट्रेन उशिराच आली आणि तीही तुडुंब भरून. कसलाच विचार न करता मी पासधारकांच्या डब्यात शिरलो नि कोपऱ्यात चुपचाप उभा राहिलो.
एका तासात ट्रेन कर्जत ला पोहोचली. ट्रेन मधून उतरताच जुई भेटली, इथेच सुकृत पण येणार होता पण त्याची ट्रेन लेट होती (खर तर त्याची ट्रेन चुकली होती हे त्याने नंतर सांगितलं) वेळ पाहून आम्ही पुन्हा नाश्त्याला निघालो. ATM च्या शोधात बाहेरचा पूर्ण रस्ता तुडवला. नंतर सुकृत ला शोधत पुन्हा स्टेशन वर आलो, तो स्टेशन कॅन्टीन मध्ये निवांत नाश्ता करत होता. प्लॅटफॉर्म वर खोपोलीसाठी जाणारी गाडी उभीच होती वेळे अभावी तिकीट न काढताच आम्ही सवार झालो. जवळ पास 20 मिनिटांच्या प्रवसानंतर खोपोली स्टेशन पोहोचलो आणि अशा रीतीने मी पुणे ते खोपोली बिना तिकीट प्रवास केला (Ps: जुई ने माझा कर्जत पर्यंत तिकीट काढला होता)
स्टेशन वरून बाहेर पडताच आम्ही थेट 10 मिनिटांच्या अंतरावर असलेला ST स्टँड गाठला. चौकशी केल्यावर कळलं की पाली साठी ST एका तासाने येणार आहे. सुकृतला दुसरा पर्याय माहिती होता तो म्हणजे टमटम. पण पाली साठी जाणारी टमटम ही पुढच्या चौकात. आम्ही वेळ न घालता ऑटो ने टमटम चौकात गेलो. तिथून आमची टमटम तुडुंब भरून पाली साठी निघाली.अर्ध्या पाऊण तासाने भाऊने टमटम एका चौकात थांबवली आणि आम्हाला दुसऱ्या टमटम मध्ये बसवलं. पुन्हा अर्ध्या तासाने खडकाळ रस्त्यावरून आम्ही अखेर पाली ला पोहोचलो. एव्हाना दुपार झाली होती, पोटात कावळे ओरडत होते. आम्ही पेटपूजा करायचे ठरवले. 5 मिनिटाच्या अंतरावर असलेली मेस शोधायला 20 मिनिटे गेली. शेवटी एका गल्लीत मेस भेटली आणि आम्ही चिकन वर ताव मारला. पाच्छापुर गावी जाण्यासाठी टमटम वाला चक्क 300 रुपये मागत होता. 2nd opinion म्हणून दुसऱ्या टमटम वाल्याला विचारल्यावर कळलं की अर्ध्या तासात पाशापुर साठी ST भेटेल. आम्ही लगेच स्टँड वर गेलो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भेटली ती म्हणजे ST महामंडळाचे पाली मधले टाइमटेबल. ते पाहून पहिला तर पश्चाताप झाला आणि मग परतीच्या बस चा टाइम बघून दिलासा.
<p style="text-align:left;"><img class="wp-image-39 alignnone size-full" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/02/mvimg_20181229_142905-017039869962282850297.jpeg" width="2963" height="3000"></p>
वरती दिसतंय तसे जुई आणि मला डायरेक्ट पुण्यासाठी तर सुकृत ला खोपोली साठी बस होती. ऑफिस मधून खात्री करून परतीचा प्रवास आताच ठरवून मोकळे झालो.
इतक्यात ठाकुरवाडीची लालपरी येऊन समोर उभी राहिली. बस मध्ये शाळकरी मुलं होती त्यांच्याकडून येण्या-जाण्याची, खाण्या-पिण्याची सगळी माहिती मिळाली. खिडकीतून डोकावून सुधागड बघता बघता अर्ध्या तासात आम्ही पायथ्याशी वसलेल्या ठाकूरवाडी गावात पोहोचलो. तिथेच एका दुकानात वाटेची चौकशी करून वेळ न गमावता शिखराच्या मार्गी लागलो.
[caption width="3456"]<img class="wp-image-29 size-full" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/01/mvimg_20181229_1530004678420965182626129.jpg" width="3456" height="4608">सुधागड (Mandatory Pic 😁)................ 3.30 PM[/caption]
ट्रेक ची सुरुवात ही रस्त्यालाच लागून असलेल्या बालवाडीपासून होते. ही पाऊलवाट पुढे गावच्या एका गल्लीतून सुधागडच्या दिशेने निघते. थोडे अंतर कापल्यानंतर आम्हाला खाली उतरणारा एक ग्रुप भेटला. त्यांच्याकडे पुन्हा थोडी विचारपूस करून मार्गी लागलो. सकाळी थंडी मध्ये सहारा देणारा स्वेटशर्ट मात्र मला आता उन्हामुळे नकोसा झाला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच लोखंडी जिना दिसू लागला. इथे चढाई थोडी कठीण असल्याने जिन्याची सोय दोन टप्यांमध्ये केली आहे. सोबतच एक जुना जिना आहे जो दगडी पायऱ्यांना मिळतो. हा रस्ता वापरात नसल्याने त्यावर सुखे गवत होते, म्हणून आम्ही पण नवीन जिन्यानेच मार्गस्थ झालो. थोडं वरती गेल्यावर एक गावकरी मुलगा लिंबू पाणी घेऊन बसला होता. थोडी विश्रांती घेऊन, लिंबू पाणी पिऊन पुन्हा पुढे निघालो. अर्ध्या तासात आम्ही चिलखती बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्यांपाशी पोहोचलो. थोडा वेळ फोटोग्राफी करून सरळ चिलखती बुरुजावर पोहोचलो. तिथून दिसणारा नजारा, टकमक टोक बघून मन प्रसन्न झाला. बुरुजाची पुरेपूर टेहळणी केली, भरभरून फोटो आणि विडिओ काढले. जवळ पास एक तास गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अजून बरीच चढाई बाकी आहे.
[caption width="3456"]<img class="size-full wp-image-31" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/01/img_20181229_1602383939542413440011737.jpg" width="3456" height="4608">लोखंडी जिना.....................4.03 PM[/caption]
<img class="wp-image-30 size-full" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/01/mvimg_20181229_1635452422771875910420193.jpg" width="3456" height="4608">
चिलखती बुरुजाकडे जाणाऱ्या पायऱ्या...............4.35 PM
[caption width="3000"]<img class="wp-image-40 size-full" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/02/mvimg_20181229_1653262237116141391550611.jpg" width="3000" height="2250">चिलखती बुरुज.......................................... 4.53 PM[/caption]
थोड़ वर गेल्यावर पाण्याचं टाकं सापडल. सुकृतने पाणी पिऊन पिण्याजोग आहे की नाही याची खात्री केली मग आम्ही अर्ध अधुऱ्या bottle भरून घेतल्या, सोबत एक मासा ही अडकला.
<img class="size-full wp-image-32" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/01/mvimg_20181229_1722464512059385895474982.jpg" width="3000" height="2250">
पाण्याच्या टाकीतून पाणी काढताना सुकृत...........5.22 PM
पाणी पिऊन तृप्त झाल्यावर आम्ही पुढे निघालो. जागोजागी असलेल्या खुणा पाहून आम्ही अगदी आरामात सुधागडच्या माथ्यावर पोहोचलो. तो पर्यंत सूर्य ढळू लागला होता, म्हणून आम्ही सूर्यास्ताचे सुख तिथेच अनुभवायचे असे ठरवले. जस जसा सूर्य घरी जात होता तस तसे आभाळ सोन्यासारखे चमकू लागले.
[caption width="2289"]<img class="wp-image-33 size-full" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/01/picsart_01-03-116953980487554236946.jpg" width="2289" height="2289">सोनेरी सूर्यास्त .......…..................................... 5.54 PM[/caption]
अजून पर्यंतचा सगळ्यात सुंदर असा हा सूर्यास्त डोळ्यांच पारणं फेडून जात होता. मी ही संधी साधून DBZ च्या काही attacks साठी सूर्याचा वापर करून घेतला. डोळ्यांसोबत फोन च्या गॅलरी मध्ये ही सूर्यास्त साठवून मग आम्ही वाड्याकडे निघालो. वाटेतच आम्हाला एक शिव मंदिर भेटले जिथे रात्र काढण्याचा विचार सुकृत करत होता, पण मंदिर आम्हा तिघांसाठी ही खूपच लहान होते. थोड्या वेळाने आम्ही तळ्यापाशी आलो. काळोख होण्यापूर्वी वाडा गाठणे गरजेचे होते म्हणून आम्ही वेळ न घालवता जंगलाच्या दिशेलाच दूरवर असलेल्या तैलबैला च्या दिशेने निघालो.
<img class="alignnone size-full wp-image-43" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/02/picsart_01-03-116989220896849961973..jpg" width="2289" height="1641">
Background ला दिसणारा तैलबैला..............6.12 PM
थोडं अंतर कापल्यावर वर वाड्याची झलक दिसू लागली आणि सोबतच प्रत्येक ट्रेक ला भेटणारा गाईड: डॉगी भाऊ. लगेच आमची ओळख झाली, जुई कुत्र्यांना घाबरत असल्याने ती मात्र चार हात लांबच होती. वाड्याच्या बाहेरूनच चार हाका मारल्या पण कुणाचाच प्रतिसाद नव्हता. शेवटी मागून झाडावरून एक प्रतिसाद आला तो म्हणजे माकडांचा. हे ही नेहमी प्रमाणे या ट्रेक ला पण सोबतीला होतेच. मगाशीच वाटेत आम्हाला कळालं होत की, जवळपास 6-7 जणांचा ग्रुप आमच्या पुढे रवाना झाला होता. आता मुक्काम ठोकण्याचा एकच ठिकाण होत ते म्हणजे श्री भोराई मंदिर. म्हणून मग आम्ही आमच्या नव्या गाईडला घेऊन मंदिर गाठले.
[caption width="2065"]<img class="wp-image-41 size-full" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/02/img_20181229_213310_17901557864779644032261..jpg" width="2065" height="1080">श्री भोराई मंदिर........................................... 6.36 PM[/caption]
तिथे आम्हाला मंदिराचे पुजारी संतोष मामा आणि त्यांचा सोबती भेटला. घड्याळात साडे सहा वाजले होते आणि पोटात साडेबारा. चक्क 3 तासांच्या ट्रेक नंतर पाठीवरचा सामान खाली उतरून आराम घेतला. सोबत आणलेला सुखा मेवा म्हणजे बिस्कीट, चिक्की काढून तात्पुरती भूख भागवली आणि गाईडला ही बिस्किटे चारून जवळीक वाढवली. हिवाळा असल्याने सूर्याने जरा लवकरच डुलकी मारली होती आणि मागे भलताच गारवा सोडला होता. पुजारी मामा दुसऱ्या ग्रुप च्या खाण्या पिण्याची सोय करत होते. पुजारी मामाकडे पाणी, भांडीकुंडी अशी सगळीच सोय होती. म्हणून लगेच चूल मांडून चहाची तयारी सुरू झाली. तीन चार कप चहा आणि सोबत चुलीच्या उबेमुळे थंडीपासून तात्पुरती सुटका भेटली. तोपर्यंत फिरायला गेलेला त्यांचा ग्रुप ही परतला होता. सुकृतने सोबत मॅगी आणली होती, त्यामुळे आमच्या जेवणाची सोय तीच, सोबत पुजारी मामांनी आणलेलं जेवण ही होतच. चहाच्याच भांड्यात मॅगी शिजत होती. तोपर्यंत सोलारच्या उजेडात मी मंदिर टिपू लागलो. मॅगी शिजली न शिजली आम्ही तुटून पडलो, चमचा सोबत न आणल्यामुळे भेटेल त्याने मॅगी संपवली...
[caption width="1080"]<img class="wp-image-35 size-full" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/01/img_20181229_213218_0782773024890824535104.jpg" width="1080" height="2065">परफेक्ट ट्रेक डिनर: मॅगी 😋.............................7.43 PM[/caption]
भरपेट पोटपूजा झाल्यावर मग फेर- फटका मारायला बोकडशीर पहाऱ्याकडे निघालो. वाटेत भांडे आणि धान्य कोठाराचे अवशेष पाहायला मिळाले. म्हशी आणि गाईचा बराच मोठा कळप रवंथ करत बसला होता. हाडाच्या कड्यावरून दिसणारं गाव Citylights प्रमाणेच गाव चमकत होता. थंडगार हवेत त्या शांततेने पृथ्वी वर असलेल्या आपल्या अस्थित्वेची जाणीव करून दिली. बराच वेळ गेल्यावर आम्ही मंदिराच्या, परतीच्या मार्गाला निघालो. गडद काळोखात मंदिरावरचा सोलार मार्गदर्शन करत होता.
[caption width="3000"]<img class="size-full wp-image-42" src="https://trekkanical.files.wordpress.com/2019/02/img_20181229_2057446111004625666443971.jpg" width="3000" height="2250">गावच्या citylights!!!.................................. 8.58 PM[/caption]
मंदिरात आल्यावर झोपायची तयारी सुरू झाली, तस सुकृत ने टेंट आणला होता. पण त्या गार सोसाट्याच्या वाऱ्यात बाहेत झोपणं माझ्यासाठी तरी कठीणच होत. म्हणून मग आम्ही मंदिरात राहायचा ठरवलं. मंदिरात जवळपास 15 ते 20 जण आरामात मुक्काम ठोकू शकतात. खाली अंथरण्यासाठी काहीच नसल्याने एका बाजूला आम्ही टेंट अंथरला आणि वर sleeping बॅग टाकून निद्रेसाठी सज्ज झालो. हवेमुळे मंदिरावरचे पत्रे भयंकर आवाज करत होते अशात झोप येणे कठीणच वाटत होते. पण दिवसभराच्या थकव्यामुळे एरवी निवांत बारा वाजवणारे आम्ही दहा च्या सुमारास कधी निद्रेच्या आहारी गेलो काही कळलेच नाही.