हरिश्चंद्रगड - एप्रिल 2016

Tripoto

अचानक भयानक वाला प्लॅन...

शुक्रवारी संध्याकाळी 5 च्या आसपास जयंत चा कॉल आला कि उद्या हरिश्चंद्र ला जाऊयाच. मला लगेच उत्तर देण शक्य नव्हतं. मी त्याला म्हंटल कि मी सांगते नंतर. त्यानंतर मी busy होती. मैत्रिणीकडे पूजा होती तिकडे. रात्री 12 ला घरी अली तेव्हा मी confirm सांगितलं कि मी येतेय. तेव्हा जयंत आणि पूजाचं group वर कस जायचं याच discussion चाललं होतं. ते सगळं ठरवलं अन् तयारीला लागले. झोपयलाच 2.30 वाजले अन् मला 3.30 ला उठणं भाग होतं कारण आवरून 4.30 घराबाहेर पडली तरचं मला ठरलेली ट्रेन मिळणार होती.

सकाळी चक्क पहिल्या अलार्म ला जाग आली (फिरायला जायचं असलं कि बरोबर जाग येते हे तुम्ही पण मान्य कराल). मी आवरून वेळेत ट्रेन पकडली सुद्धा. पण नेमकी 2 mins नी जयंत ची ट्रेन सुटली. मग काय... ठाण्याला भेटायचं ठरलं. तिथून दुसरा काही option मिळतो का हे बघायचं ठरलं. मी ठाण्याला पोहचली. 5 min मध्ये पूजा पण आली. मग जयंत पण आला. आम्ही 6 ला ठाण्यात होतो आणि त्यांतनर कसारासाठी direct 7.30 ची ट्रेन होती. मध्ये मेल होत्या पण त्याही जवळपास त्याच वेळेत पोहचत होत्या. शेवटी 7.30 च्याच गाडीने जायचं ठरलं. वेळ बराच होता. म्हणून नाश्ता उरकून घेतला. मस्त इडली अन् गरमा गरम कॉफी.

नाश्ता वगैरे झाला पण प्लॅन फिसकटतो कि काय असं वाटत होतं. कारण आम्ही कितीही प्रयन्त केले तरी 10 च्या राजूर-पाचनई गाडीच्या वेळेत पोहचणार नव्हतो. योगेश ओतूरला गावलाच होता. म्हणून त्याला कॉल करून ओतूरहून पाचनई साठी काही ऑप्शन आहे का हे बघायचं ठरवलं. योगेशला कॉल केला. पण साहेब झोपलेले होते, बाबांनी कॉल उचलला. त्यांना सांगितलं तो उठल्यावर कॉल करायला सांगा. कसारा ट्रेन यायला 5 min असताना योगेशचा कॉल आला. त्याला विचारलं कि ओतूरहून काही ऑप्शन आहे का, तर योगेश म्हंटला कि मी गाडी आणलीये गावाला. मीच येतो ट्रेक ला गाडी घेऊन. योगेशच ते बोलणं ऐकून आमच्या तिघांचा जीव भांड्यात पडला. तिघंही एकदम खुश झालॊ.

ट्रेन पकडून कल्याणला आलो तर ST ला हि मरणाची गर्दी. सगळेच गावी निघालेले. 3-4 ST सोडल्यावर कशीबशी एका ST मध्ये जागा मिळवली आम्ही. ST रस्त्याला लागल्यावर योगेशला कॉल करून निघाल्याच कळवलं अन् फोन flight mode वर टाकून तिघांनी पण पडी मारली. कारण अचानक भयानक प्लॅन झाल्यामुळे झोप कोणाचीच झाली नव्हती. माळशेज गेल्यावर मला जाग आली. मग मी जागचं रहायचं ठरवलं कारण ओतूर ला पोहचायच्या आधी योगेश ला कॉल करायचा होता. 12 वाजता ओतूरला पोहचलो. थंड उसाचा रस आणि कलिंगड खाई पर्यंत योगेश गाडी घेऊन हजर झाला. गाडीत बसलो अन् झिंग झिंग झिंगाट करत गाडी निघाली. मस्त आरामात गेलो. कारण आम्हाला सूर्यास्त होईपर्यंत कोकणकडा गाठायचा होता. वेळ खूप होता आमच्या कडे. 2.30-3 ला पाचनई ला पोहचलो. रस्त्यात गाडी थांबवून झाडावरची करवंद तोडून खात बसलो म्हणून जरा जास्त वेळ.

बॅगा परत एकदा नीट भरून चढाईला सुरुवात केली. अगदी निवांत करवंद खात चाललो होतो. त्यात आमच्या पूजा मॅडम ना बर नव्हतं वाटत. त्यामुळे मस्त आरामात मज्जा करत चढलो. हरीश्चंद्रेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथल्या टाक्यातलं थंडगार पाणी प्यायलो तसा सगळा थकवा पळून गेला. पाणी भरून घेतलं. अन् कोकणकड्याकडे निघालो.

कोकणकड्यावर जाण्याआधी भास्कर दादाच्या घरी बॅगा ठेवल्या. बाबांशी बोललो अन् मग कोकणकड्यावर गेलो. मस्त निवांत सूर्यास्त बघितला. वारा तर एवढा मस्त थंड होता कि एप्रिल चालू आहे असं वाटतंच नव्हतं. थोडंफार वरवरचं खाल्ल्यामुळे आम्ही दुपारी जेवलो नव्हतो त्यामुळे आता पोटात कावळे ओरडू लागले होते. योगेश च्या मोठ्या आईने त्याच्याबरोबर मस्त चपात्या, बटाटाच्या काचऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी दिली होती. कोकणकड्यावरच त्यावर मस्त ताव मारला. अंधार पडू लागला तसं भास्कर दादाकडे जायला उठलो. कारण टेंट घेऊन जागा बघून तो लावायचा पण होता. घरी जाऊन मस्त आई-बाबांशी गप्पा मारल्या थोड्या अन् आमचं सामान घेऊन टेंट लावायला निघालो. छानशी जागा बघून टेंट लावला. त्यात सर्व सामान टाकलं, आत्ता आम्ही उंदडायला मोकळे.

Photo of हरिश्चंद्रगड - एप्रिल 2016 1/3 by Manasi K
कोकणकड्यावरचा सूर्यास्त

कोकणकड्यावर जाऊन निवांत चंद्र-तारे बघत पडलो.

थंडगार वारा, वर आकाशात चमकणारे असंख्य तारे, चंद्र, मोबाईल वर लावलेली जुनी गाणी. अहाहा. सुख हो. यासाठीच केला सारा अट्टाहास हा.. हा क्षण कितीदाही जगा प्रत्येक वेळेस एक वेगळाच आनंद देऊन जातो.

थोड्यावेळाने थंडी वाढायला लागली तसं बाबानी बनवलेली कढी आठवाया लागली. घरी जाऊन मस्त गरम गरम कढी पिऊन परत कड्यावर येऊन पडलो.

पण तेवढ्याने आमचं भागणार थोडी होतं. थंडीच तशी होती ओ. थोड्यावेळाने मी टेंट मध्ये जाऊन कॉफीच सर्व समान घेऊन आले. Portable stove वर मस्त झकास कॉफी बनवली. त्या बोचऱ्या थंडीत तेवढीच जीवाला शांतता. खूप वेळ गप्पा मारून झोपायला निघालो.

पहाटे पहाटे योगेशच्या आवाजाने जाग आली. तो moon light मध्ये काढलेला बाहेरच्या climate चा pic दाखवायला आला होता. Pic दाखवून तो निघून गेला. पण तो pic बघितल्यावर झोप उडूनच गेली होती. टेंट च्या बाहेर पडले अन् स्वर्गात आल्यासारखंच वाटलं. सगळीकडे नुसते पिंजून ठेवलेल्या कापसासारखे ढग दिसत होते. समोर चंद्र अन् त्याखाली तांबूस रंग. आधी ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर आवरून उतरायला घ्यायचं ठरलं होतं. पण समोरचं वातावरण बघता लक्षात आलं कि सूर्य उगवेपर्यंत ढग असेच राहिले तर इंद्रवज्र दिसण्याची शक्यता आहे. मग कसले हलतोय आम्ही कोकणकड्यावरून.

Photo of हरिश्चंद्रगड - एप्रिल 2016 2/3 by Manasi K
morning clouds at kokankada

समोर चालणारा ढगांचा खेळ बघण्यात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि हळू हळू सूर्यनारायण उगवायला लागले. समोरचे ढग तसेच होते. आत्ता तर आमची 101% खात्री झालेली कि इंद्रवज्र दिसणारच. जिथे ढग जास्त होते अन् सूर्याची किरणे बरोबर आमच्या मागे येतील अशा जागी जाऊन सगळे आपापली जागा पकडून उभे राहिले.

थोड्याचवेळात सूर्यनारायण पूर्ण पणे टेकडी आडून बाहेर आले. आणि ज्याची सर्व आतुरतेने वाट बघतात तो निसर्गाचा चमत्कार आम्ही सर्वांनी अनुभवला. सूर्यनारायण जसे बाहेर आले तसे आमचे सर्वांचे लक्ष फक्त समोरच्या ढगांवर लागले होते. त्यावर आमची सावली पडायला लागली न त्या भोवती इंद्रवज्र दिसले. अफलातून होता तो अनुभव. स्वतःची ढगांवर पडलेली सावली अन् त्याभोवती इंद्रवज्र. आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण. जोपर्यंत सूर्यावर ढग येत नाहीत तोपर्यंत तो अनुभव आम्ही घेत राहिलो. कधी सावली अगदी जवळ पडायची तर कधी दूरवर दिसायची. प्रत्येकजण स्वतःच इंद्रवज्र बघण्यात मग्न झालेला. उतरायला उशीर होतोय हे कोणाच्याच ध्यानीमनी पण नव्हतं तेव्हा. थोड्यावेळाने ढगांनी सूर्यनारायणाला झाकून टाकलं आणि आम्ही निघायचं ठरवलं.

Photo of हरिश्चंद्रगड - एप्रिल 2016 3/3 by Manasi K
इंद्रवज्र

टेंट मध्ये जाऊन सर्व आवराआवरी केली. सर्व सामान घेऊन भास्कर दादाच्या घरी गेलो. आई-बाबांचा निरोप घेऊन उतरायला लागायचं ठरलं. पण घरी गेलो तर नेमकं चुलीवरून परतवलेल्या भाताची कढई खाली उतरवली जात होती. बॅगा तशाच टाकून चौघंही गरम गरम भात खायला बसलो. काही मिनिटातच कढई रिकामी झाली. बाजूला पोहे होते. पण त्या भातापुढे पोह्याची काय चव. आई-बाबांचा निरोप घेऊन निघालो.

खाली मंदिरात आलो. दर्शन घेतलं. टाक्यातलं थंडगार पाणी भरून घेतलं आणि उतरायला सुरुवात केली. मस्त रमत-गमत, चढताना केलेली मस्ती आठवत उतरलो. खालच्या घरी जाऊन वहिनींचा निरोप घेतला अन् निघालो. निघायला आम्हाला 10.30 वाजले होते. 12.30 पर्यंत आम्ही ओतूरला पोहचलो.

ओतूरला पोहचल्यावर योगेश लगेच निघाला कारण त्याला गावात लग्नाला जायचं होतं. मी, पूजा, जयंत ने पेटपूजा करायचं ठरवलं. पेटपूजा उरकून घेतली आम्ही आणि st ची वाट बघायला लागलो. पण आत्ताही आमची तीच हालत. St मध्ये जागाच मिळत नव्हती. 2 च्या आसपास आम्हाला finally ST मिळाली. आणि आम्ही मुंबईच्या प्रवासाला लागलो, अविस्मरणीय क्षण सोबत घेऊन.

#हरिश्चंद्र

#इंद्रवज्र

#अविस्मरणीय_ट्रेक

#मन

Day 1