!! First Sunrise of 2016 from Top of Maharashtra !!
कळसुबाई शिखर
(ता . अकोले, जि . अहमदनगर )
"अरे वैभव , बरं झालं फोन केलास ; मी करणारच होतो 31st चा काय plan आहे? कळसुबाई ला येशील का?" - सौरभ .
साल २०१६ या नवीन वर्षा च स्वागत - आणि Mumbai Travellers ची 4th Anniversary, असा दुहेरी योग.
Finally - ऑफिस मध्ये शिफ्ट वगरे सगळा manage करून सौरभ ला होकार कळवला. आता नवीन वर्षाच्या पाहिल्या ब्राम्हमुहुर्ता नंतर होणाऱ्या नारायणाच्या दर्शनाचे वेध लागले होते.
कळसुबाई! … ५४०७ फुट (१६४६ मीटर ) उंच असलेलं, हे महाराष्ट्रातील अत्युच शिखर, ईगतपुरी - भंडारदरा या मार्गावर असलेल्या 'बारी' या गावाजवळ आहे.
१० नाही, २० नाही तर आम्ही तब्बल १०६ लोकांनी 31st च्या रात्री हा महाकाय सर केला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुर्य - नारायणाच्या आगमनाचे दर्शन घेतले.
अर्थातच पुर्व नियोजनासाठी सौरभ आणि जोगी जी यांचा आधीच बारीला मुक्काम होता, आणि साहजिकच इकडील सर्व व्यवस्थेचा भार हा करीष्मा आणि मयूर शिंदे ऊर्फ मामा यांच्या खांद्यावर होता. आज पर्यंत फक्त Phone आणि mails वर communication झालेल्या करीष्मा आणि जोगी यांना मी प्रथमच भेटणार होतो, त्यामुळे ती एक आगळी - वेगळी उत्सुकता माझ्या मनात रमत होती.
तर …. ३१ तारखेला संध्याकाळी जवळपास आम्हा १०० लोकांचा लवाजमा कसाऱ्या हून बारी कडे रवाना झाला.
बरोबर ५ वर्षा पुर्वी काही स्वप्न उराशी बाळगून Mumbai Travellers या कंपनी चा उदय झाला आणि 31st - Night Trek to Kalsubai & First Sun Rise of New Year from top of Maharashtara! अशी प्रथा च ३१-डीसेंबर २०११ पासून सुरु झाली. पुढे जाऊन या प्रथेच परंपरेत नक्की रुपांतर होईल या बद्दल शंकाच नाही.
'विराज खोरजुवेकर ' एक आगळ - वेगळं नैसर्गिक व्यक्तिमत्व, या माणसा मुळेच माझी आणि Mumbai Travellers ची ओळख झाली. गेल्या तीन - साडेतीन वर्षात MT बरोबर अनेक इवेन्ट स झाल्या. अगदी पाहिल्या दिवसा पासुन इथे परकं असं कधी वाटलंच नाही. पुढे याच प्रवासात - वैभव खैरे , कौस्तुभ सावंत , किरण माळवी आणि काही भन्नाट Travellers यांच्याशी ओळख आणि मैत्री झाली.
कळसु आई चा आशीर्वाद आणि मुंबईकरांच भरभरून प्रेम लाभलेल्या Mumbai Travellers ला पुढील वाटचाली साठी - आम्हा पुणेकारांच्या भरभरून शुभेच्छा ! :-)
शेवटची Batch घेऊन मी बारी ला पोहोचलो. आमच्या आधी आलेली मंडळी विश्राम घेऊन जेवणात मग्न झाली होती. आम्हीही मग जेवणं आटोपली.… गोरक्षच्या घरास आज जणू काही सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते… घटीका जवळ आली होती …. count down begin … आणि बरोबर १२ च्या ठोक्याला १०६ travellers चा एकच निनाद … "Haaapppy New Year !!!" … मग काय … Crazy introduction round …. Cake cutting …. शुभेच्छांची देवाणघेवाण … एक आनंदाई वातावरण .… 'इलाही … मेरा जी आये -आये … " या travellers song ने आम्ही कार्यक्रमाची सांगता केली व इंदोरे गावाकडून येणाऱ्या नवीन मार्गाने आम्ही Trekking ला सुरवात केली .
आमच्या पैकी बऱ्याच मंडळींचा हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच ट्रेक होता - 'First Trek आणि महाराष्ट्राचा Everest' असा किताब त्यांना बहाल करुन …. दत्ता , अमोल कदम … यांच्या टीम ने छेडलेल्या मराठी गाण्यांच्या मैफिलीत आम्ही आगेकुच करत होतो.
किर्र - अंधार … डोंगराच्या कातळावरून होणारा शिस्तबद्ध ट्रेक आणि प्रत्येकाच्या हातातील टॉर्च या सर्वांच्या संयोगामुळे झालेल्या रांगत्या दीपमाळेच विलोभनीय दृष्य ! :-) … वा … वाह … क्या बात !!
पहिल्या थांब्यावर सौरभ ने सांगीतलेली कळसुबाई ची कथा कानात साठवून आमची पाऊले पुन्हा शिखराच्या दिशेने झपझप चालू लागली. आकाशातील जळ्मटं हळू-हळू वीरत होती आणि बोचरी थंडी अंगाला आता वाऱ्याच्या झुळकेने शहारे आणत होती.
नजर उंचावली … आगदी थोड्या अंतरावर पिवळ्या , लाल , पांढऱ्या रंगाने रंगवलेलं लहानश्या शिखरावरील कळसू आई च छोटंसं देऊळ, ब्रह्म-मुहूर्तावर भास्कराने उधळलेल्या केशरी भंडाऱ्यात उजळून निघालं होतं . याच कळसू आई च्या आशीर्वादाने नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाच्या दर्शनाचा योग सिद्ध झाला होता.
सन १८६० मध्ये Arch DiCken Gale या इंग्रजाने भर रात्री कळसुबाई शिखर सर करून सूर्योदय पहिला होता आणि इथल्या अचाट नैसर्गिक सौंदर्याने त्याचं भान हरपलं होतं आणि म्हणूनच या पट्ठ्या ने कळसुबाई चा उल्लेख - 'King of Deccan Hills' असा केला असावा.
आदिदेव ! नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर ।
दिवाकर ! नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते ।
अशी मनोमन प्रार्थना करून रविराजांच दर्शन घेतलं! या अभुतपुर्व दर्शनाने, रात्राभराचे जागरण आणि ट्रेक यामुळे आलेला शीण कुठच्या-कुठ पळून गेला.
शिखरावर चढुन गेल्यावर शिखरमाथा आगदीच लहान असल्याचं लक्षात येतं, डावीकडे जेमतेम १०' X ८' आकारच दगडी बांधनीच कळसुबाईच मंदिर आहे. दरवाजा अगदीच कमी उंचीचा असुन देवळात जाताना बसुनच जावं लागतं, देवीची शेंदरी मूर्ती साडेतीन फुट उंचीची आहे. मंदिराला घुमटाकार कळस असुन या गाभाऱ्यात एक लाकडी काठी आहे, नवस फेडण्यासाठी म्हणून लावलेले लाल वस्त्रांचे तुकडे आणि हिरव्या बांगड्या या काठीला लटकवलेल्या दिसतात. मंदिरासमोर ध्वज लावण्याचा ओटा आहे. शिखरावरून चहुबाजुंचे नैसर्गिक सौंदर्य मनाला वेड लावुन जाते.
उत्तरेस नाशिक परिसरातील - रामशेज, डेहेर यांच्या मागोमाग सप्तशृंगी, मार्कांड्या, धोडप, चांदवड … तसेच हरिहरगड, ब्रम्हगिरी, अंजनेरी, घरगड व त्रिंगल वाडी या रांगा दिसतात. उत्तर-पुर्व दिशेस - बितनगड, औंढा, विश्रामगड (पट्टा), कवणी. दक्षिणेला - रतनगड, अलंग-मदन-कुलंग आणि दक्षिण-पश्चिमेस घनचक्कर व हरिश्चंद्रगड नजरेने टिपता येतात.
भंडारदरा आणि घाटघर धरणाचे back water शिखरावरून न्याहाळताना जणू काही आपण Google Map scroll करत आहोत असा भास होतो.
शिखराच्या पायथ्याशी एक विहीर आहे आणि पाणी काढण्यासाठी एक पोहरा देखील आहे. ईथेच आम्ही आमच्या डोई -खांद्या वरचं ओझं हलकं केलं आणि म्यागी व चहा वर ताव मारला. :-) … आत्माराम शांत !!
आता शिडी च्या मार्गाने आमचा परतीचा प्रवास सुरु झाला होता.
खाली दृष्टी जाताच नजर फिरेल अशा एका अरुंद घाळीवर तब्बल १८० पायऱ्यांचा लांबलचक शिडी चा टप्पा पार पडला होता. आता उजवीकडे वळसा घेऊन खाली जाणारा हा टप्पा अमंल कठिण होता. पुढे गेल्यावर अजुन एक १२-१५ फुटांचा शिडी चा मार्ग देखील पार पडला. कळसुबाईच पायथ्या नजिकच मंदिर अजुन अर्धा तास लांबणीवर होतं. पावलं आता जड भासु लागली होती, वेग सुद्धा बऱ्यापैकी मंदावला होता. दजर-दरमजल करत मंदिरा जवळ पोहोचलो.
मंदिर एकदम ऐसपैस, आवारात भला मोठा पिंपळ वृक्षं असुन बसण्यासाठी मोठा पार आहे. अजुनही काही बडे वृक्ष या आवारात आहेत. इथेच थोडा वेळ विसावलो. वाऱ्याची झुळूक आता हवी -हवीशी वाटत होती, अंगावरच स्वेटर तर केव्हाच दूर झाल होतं.
गोरक्षच घर ! दोन्ही खोल्यांमध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या, जेवणं उरकत होती. कसाऱ्याला जाण्यासाठी आमच्या गाड्या आधिच येऊन उभ्या ठाकल्या होत्या. १०-१० च्या ब्याचने सर्वांचा निरोप घेत आणि … "मिलते है यार… फिर किसी ट्रेक पे । " असं एकमेकांना वचन देऊन प्रत्येक जण मार्गस्थ होत होता.
आठवणीचं गाठोड घेऊन मी ही निघालो.… गाठोडं कसलं शिदोरीच म्हणावी लागेल!
या संपूर्ण प्रवासात… सौरभ, मामा, जोगी, करिश्मा, अर्जुन पाजी, देवेंद्र, दत्ता, अमोल, स्वप्ना, हिमालय, वर्षा, शुभम, चिन्मय, हर्षित कहि MBA व CA चे विध्यार्थी यांच्या बरोबर झालेली चर्चा, विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण … काहि विनोदी क्षण, जोगी च झालेलं आधार कार्ड :p यांना उजाळा देत होतो….
परंतु … Event Successful झाल्याचा सौरभच्या डोळ्यातील आनंद व राम-पहाऱ्यातलं प्रभाकरच रूप मात्र नजरे समोर अजुन सुद्धा तसंच आहे.
“We can only appreciate the miracle of a Sunrise if we’ve waited in the darkness.”
#mumbaitravellers #sunrise #kalsubaipeak
Frequent searches leading to this page:
maharashtra tour packages from delhi, top maharashtra tour packages with price, family holiday packages in maharashtra, honeymoon packages in maharashtra, honeymoon packages from mumbai, international honeymoon packages from mumbai