हंपी - यंत्रोधारक अंजनेया
हंपी म्हंटल की विरूपाक्ष मंदिर, हेमकुटा, सनापुर coracle अजून बराच काही डोळ्यासमोर येत. प्रत्येक जागेला ज्याचं त्याचं वलय आहे. Coracle राईड हरवलेला उत्साह परत आणून देते. हेमकुटा किंवा अंजानद्री - मातंगा म्हंटल की सुर्यास्त सूर्योदय. विठ्ठल मंदिर तर साक्षात पंढरपूर दर्शनाच सुख देतं. लक्ष्मीन डोक्यावर सोंड ठेऊन दिलेला आशीर्वाद तर बाप्पाला भेटल्याचा आनंद देऊन जातो. फिरता फिरता एक रिक्षा दिसली त्यावर लिहिलं होतं " heaven is myth Hampi is real."
तर या सर्वां बरोबर एक खुप छान मंदिर तुंगभद्रेच्या काठावर पाहायला मिळालं. कोदंड राम मंदिर. भगवान राम, सीता माता, लक्ष्मण आणि सुग्रीव. हो बरोबर. हनुमंत नाही तर सुग्रीव आहे. आणि तिथूनच थोडं अंतर चालून काही पायऱ्या चढून वर गेलो तर " यंत्रोधारक अंजनेया " म्हणजेच हनुमंत एका यंत्रा मध्ये पद्मासनात बसले आहेत. असं म्हणतात की व्यास मुनी ध्यान धारणा करायचा प्रयत्न करत होते. पण तिथली वानरं त्यांना त्रास देत होतीत. त्यामुळे व्यत्यय येत होता. अश्या वेळी काय करावं. तर त्यांनी हनुमंताना मोहित करून एका गूढ यंत्रा मध्ये पद्मासनात बसवलं. त्या बरोबर सर्व माकडं शांत झाली आणि व्यास मुनी ध्यान करू शकले. अतिशय मंत्रमुग्ध करणारी जागा आहे ती. एक तर तुंगभद्रा वेगाने वाहती आहे. भले मोठे खडक आपलं रौद्र रूप दाखवत उभे आहेत. अणि दुसऱ्या बाजूला ही दोन मंदिर. अंतर्मुख व्हायला होतं.
- प्रशांत दिलीप कुलकर्णी.
माहिती सौजन्य: Dr. C. S. Vasudevan यांच्या पुस्तकातून.