Gwalior killa

Tripoto
13th Feb 2021
Day 1

आपला भारत देश इतिहासाच्या बाबतीत अतिशय श्रीमंत आहे. आपल्या देशात अनेक शुरवीर राजांनी बांधलेले इतिहासाची साक्ष देणारे अनेक सुंदर आणि भव्य गड, किल्ले आहेत. आपला महाराष्ट्र सुद्धा गड, कोट ह्या बाबतीत अतिशय लकी आहे. अशीच एक भव्य वस्तू जेथे कधी काळी मराठ्यांचा सुद्धा राज्य होता असा मध्यप्रदेशातील एक महत्वाचा किल्ला म्हणजे ग्वाल्हेर चा किल्ला अजूनही खूप चांगल्या स्थितीत असा हा किल्ला आहे उत्कृष्ट अशी सजावट आणि नक्षीकाम आणि वेगवेगळ्या रंगकाम ह्या किल्ल्यावर बघायला मिळेल
हा ग्वालियर किल्ला इसवी सनाच्या आठव्या शतकात ग्वालियर जवळच्या एका टेकडीजवळ बांधण्यात मुख्य शहरात असणारा हा किल्ला  शहरातील कोणत्याही टोकाकडून बघू शकतो ह्या किल्ल्यावर अनेक शिलालेख ही सापडले आहेत जे जवळपास 1500 वर्ष जुने आहेत अनेक जुन्या मूर्ती आणि अनेक प्रकारचे पुरातन वास्तू व मुर्त्या किल्ल्यात जतन करून ठेवल्यात आहेत
  शून्याचा जो शोध लागला आहेत त्यांची सगळ्यात जुनी नोंद देखील ह्याच ठिकाणी किल्ल्यात मिळाली आहे
ग्वाल्हेर हा किल्ला भारतातील काही भव्य आणि प्रमुख किल्ल्यामध्ये येतो अनेक राजेरजवाडे व संस्थान ही ह्या किल्ल्याने बघितली आहे व अजूनही ह्या किल्ल्याची भव्यता तशीच आहे   किल्ल्यांमध्ये 2 महाल आहेत  1 मानसिंग महाल
आणि गुजरी महाल  मानसिंग महाल हा सगळ्यात सुंदर महाल समजल्या जातो  
          किल्ल्यावर 2  सुंदर अशी मंदिरे बघायला मिळतात  त्या मंदिराना सासू सुनेच मंदिर म्हणून संबोधले जाते दोन्ही मंदिर एक लहान व एक मोठं परंतु खूपच नक्षीदार असा मन्दिर आहे दोन्ही मंदिर 11 व्या शतकात बांधली गेली आहेत व भगवान विष्णूंना समर्पित केली आहेत  तसेच एक जोहर कुंड सुद्धा किल्ल्यावर बघायला मिळतो
              मराठेशाही म्हणजे सिंधीय म्हणजे शिंदे घराण्याचा ताब्यात हा किल्ला होता सुराजसें नावाच्या राजाने हा किल्ला बांधला आहे आणि  भव्य दिव्य अजूनही काही प्रणाम सुस्थित हा किल्ला उभा आहे शत्रूंना मृत्यूदंड देण्यासाठी एक वेगळी व्यवस्था काळकोठारी किल्ल्यात बघायला मिळते आत गेल्यानंतर पूर्ण अंधार त्यात अंतःकरण चिरडून टाकणारा काळोख त्यातील शिक्षा देणारे साखळदंड आणि तो काळोखात काळकोठारी खूपच हरवून टाकते संध्याकाळी किल्ल्यावर लाईट आणि साउंड शो नक्की बघण्यासारखा असतो असा भव्य दिव्य असा किल्ला नक्की ग्वाल्हेर ला गेलात तर बघायला विसरू नका

Photo of Gwalior Fort by Traveller shubham
Photo of Gwalior Fort by Traveller shubham
Photo of Gwalior Fort by Traveller shubham
Photo of Gwalior Fort by Traveller shubham
Photo of Gwalior Fort by Traveller shubham
Photo of Gwalior Fort by Traveller shubham