"दांडेली" हे नाव लिहिल आणि मी एकदम २०१० मधेच पोहचले. दांडेलीशी आमच खूपच जवळचा नात, कारण This was our Honeymoon destination. आम्ही हे ठिकाण निवडायचा तस खास कारण होता ते म्हणजे लग्नानंतर आम्हाला आमच्या कुलदेवीचे दर्शन घ्यायाचे होते त्यामुळे पुणे -मिरज -चिंचणी -बेळगाव असा प्रवास मार्ग ठरला आणि बेळगाव जवळचा ठिकाण म्हणून आम्ही फारच कमी जणांना माहित असणाऱ्या आणि "No phone, No TV, No disturbance" अशा दांडेलीला निवडल.
फारच कमी वर्दळ, मोकळी,प्रदूषणमुक्त हवा, हिरवागार निसर्ग,लहान लहान कौलारू घर, लहानश्या टपऱ्या आणि एकाच मोठा हॉटेल असा हे दांडेलीचे बस स्थानक. त्या वातावरणात एक वेगळाच सुगंध आणि गारवा होता ,त्यामुळे बुक केलेल्या रेसोर्टवर जायची उत्कटता अजूनच वाढली . रेसोर्टची गाडी अगदी वेळेत आली. आम्ही समान ठेऊन पुढचा प्रवास सुरु केला. जसजसा आम्ही रेसोर्टच्या जवळ जाऊ तसतशी थंडी वाढली, रस्ते आणखीनच जंगलातून जाऊ लागले. दुपारच्या १- २ च्या सुमारास सुद्धा संध्याकाळचा भास होता . हवेतील गारवा अंगाला झोंबत होता आणि साधारण २० मिनिटांनंतर आम्ही रेसोर्ट वर पोहोचलो . शहरातील आपल्या सारख्या लोकांना इतक्या निसर्गरम्य आणि घनदाट वातावरणाची सवय नसते त्यामुळे सुरुवातीचा काही काळ मला राहवेना अगदी भूत बंगले वैगरे सारख्या गोष्टी आठवायला लागल्या. रेसोर्ट मध्ये उतरल्यावर माणसांना बघून जीवात जीव आला. रेसोर्टवाल्यांनी आपुलकीने आमचे स्वागत केले आणि गरम गरम चहा दिला. एरवी आपण चहा पितो तेव्हा "चहा"या पेयाचे फार महत्व नसते पण थंडीनी गारठून गेल्यावर मात्र घेतलेल्या या चहाची किमत समजते . चहा आणि गरम गरम कांदा भजी खाऊन आम्ही मस्त फ्रेश झालो आणि त्या वातावरणात रमून गेलो.
"हॉर्नबिल" नावाच हे रेसोर्ट कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या काली नदीच्या काठावर वसले आहे.१८४ किलोमीटरच्या प्रवासानंतर पुढे ही नदी अरबी समुद्राला मिळते. रेसोर्ट नदीच्या काठावरच वसले असल्यामुळे वाहत्या पाण्याचे भले मोठे नदीपात्र बघायला मज्जा येते.ते पण निर्मळ पाण्याचे …. पुण्यासारख्या शहरात तर ते दुर्मिळच आहे. आम्ही या स्वच्छ पाण्यात मनमुराद खेळलो, पोहोलो आणि दमलो.आम्ही "tree House" घेतला होत. त्यामुळे झाडावर राहण्याचा हा पहिलाच प्रसंग.रूम मध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींची रचना खूपच छान आणि सुटसुटीत होती. इतक्या शांततेत फक्त एका गोष्टीची खूप कमतरता जाणवली ते म्हणजे टीव्ही. पण तिथे आलेल्या लोकांनी निसर्गात राहून निसर्ग अनुभवावा म्हणून रेसोर्ट वाल्यांनी कुठ्लायचं रूम मध्ये टीव्हीची सोय केली नव्हती आणि ती आज पण नाही आहे.
बाहेर काळा कुट्ट अंधार, बेडकाचे डराव डराव, रातकिंड्याचे किर्र, खिडक्यांवर पडणाऱ्या झाडांच्या सावल्या हे सगळाच माझ्यासाठी जरा भयानक होत. माझी तर जाम टरकली. कधी एकदा सकाळ होईल असा झाला होता. आयुष्यात बघितलेले सगळे भूतांचे पिक्चर आठवत होते. काही केल्या मला झोप येईना. कधी नव्हे ते मारुतीपासून सगळ्या देवांना आठवावं लागला. शेवटी रात्री १२ च्या दरम्यान उठून मी आणि आदी रूम बदलून घेण्यासाठी care taker कडे गेलो. पण शुक्रवारची गर्दी असल्या कारणाने १ पण रूम शिल्लक नव्हती. नाईलाजाने परत माघारी यावे लागले आणि जीव मुठीत घेऊन झोपले.
पहाटे लवकर उठून आम्ही जंगल सफारीसाठी तयार झालो. आत्ता पर्यंत जिप्सी पहिली होती पण आज मी यात बसणार आहे या विचारामुळे खूपच खुश होते. काळ्या कुट्ट अंधारात अनेक पक्षांचे आवाज येत होते. कोणकोणत्या ते नाही समाजला पण कानाला फारच मधुर वाटत होते.गाडीच्या आणि टोर्च्या प्रकाशांत अनेक प्राणी पाहिले. सांबर ,हत्ती,गुबगुबीत ससे,हरिण यांचे सौदर्य जंगलातच पाहावे.
७ च्या दरम्यान प्रकाश पडायला सुरुवात झाली. अनेक रंगीबेरंगी फुलपाखरे बागडू लागली. खूप चंचल अशी पण मोहक फुलपाखरांचे असंख्य प्रकार आपल्याला या जंगलात पाहायला मिळतात. थोडा वेळ तर स्वप्नांच्या गावाला असल्याचा भास झाला जसा आत्ता कदाचित तुम्हाला होत असेल. बघता बघता ८ वाजले आणि आम्ही परतीच्या वाटेवर लागलो.
रेसोर्टवर नाष्ट्याची जय्यत तयारी होती. भूक लागल्यामुळे कि काय पण सगळेच पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटला. गरम गरम डोसे, इडली, कांदेपोहे आणि चहा या सगळ्यावर ताव मारून आम्ही river राफ्टिंगला निघालो. साधारण २ किलोमीटर नदीपात्र पार केल्यावर पाण्याचा जोर वाढला, खडकामुळे थंड पाण्याचे लोट अंगावर येत होते आणि बघता बघता आम्ही भिजलोच त्यात वरून पावसाने पण हजेरी लावली.
बराच वेळ वर्षा विहाराचा आनंद लुटला आणि दुपारच्या वेळी जरा आम्ही विसावा घेतला. संध्याकाळी नदी काठावर बसून मासे पकडण्याचा प्रयत्न केला. नंतर काही वेळ आजूबाजूच्या परिसरात निवांतपणे सहजच फिरत राहिलो आणि निसर्ग अनुभवत होतो. रात्री शेकोटी भोवती बसून शेकोटीची उब अनुभवली .
दुसर्या दिवशी आरामात उठून परत एकदा नदीत डुमबायचा आनद आम्ही घेतला. आरामात आमचा समान आवरला आणि जेवण करून अनेक आठवणी मनात साठवून परतीच्या मार्गाला लागलो.
दांडेली आणि या सारखी अनेक निसर्गरम्य ठिकाण भारतात आहेत. जिथे निसर्ग, त्यातील शांतता, जंगलातील विविध प्राणी,पक्षी आपणास बरेच काही शिकवून जातात. या शांत वातावरणात आणि निसर्गाच्या सहवासात आपल्याला टीव्ही, मोबाईल फोन याची उणीव अजिबात भासत नाही. उलट याची जाणीव होते की आपण या साधनांशिवाय सुद्धा जगु शकतो . खूप अनमोल आहे हे.
अश्या या ठिकाणाला मी तर भेट दिली जमल तर तुम्ही सुद्धा आपल्या मित्रपरिवारासोबत आवश्यक भेट द्या. दांडेली आणि तेथील राहण्याची ठिकाण याची माहीती गुगलवर उपलब्ध आहे.